संस्थेस शाहू फुले आंबेडकर या समाजभुषण व सर्वोच्च पुरस्काराने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने गौरवान्वित केले आहे, ही संस्थेच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे.
वस्त्यांमध्ये विविध उपक्रम सुरू आहेत , समाजामध्ये विश्वास निर्माण करण्यात संस्थेस यश प्राप्त झाले आहे, विवेकानंद छात्रावासात या समाजाचे जे दांपत्य पर्यवेक्षक व सह पर्यवेक्षक म्हणून काम करीत आहेत, ते आता सेवेकरी म्हणूनच आपण काम करीत आहोत, ही भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. प्रशांत पवार हा विद्यार्थी छात्रावासातुन पदवीधर होतो आहे, तो आता संस्थेमार्फत वस्त्यांमधील कामाची जबाबदारी घेऊन पूर्णकालिक रूपात सेवेकरी म्हणून काम करीत आहे. छात्रावासातील प्रशांत पवार ,सुरज भोसले ,पवन पवार यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली, डिकेश भोसले, अर्जुन भोसले ,आदित्य सोळंके, तुषार पवार यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.