Print

दि.22-11-2020 रोजी रविवारला विवेकानंद छात्रावासात स्वयंरोजगार व पारधी समाज संघटन या विषयावर पारधी बंधूंसाठी कार्यशाळेचे आयोजन दुपारी २ते५ या वेळात करण्यात आले होते.निवडक ६पारधी बेंड्यावरून १२जण या कार्यशाळेस उपस्थित होते.कार्यशाळेत एकूण तीन सत्र घेण्यात आले.पहिल्या सत्रात संस्थेचे सचिव श्री.सुधीर भारतीय यांनी मार्गदर्शन केले.त्यांनी संस्थेची माहिती सविस्तरपणे विषद केली व कार्यशाळा घेण्याबाबतच उद्देश स्पष्ट केला.

दुसरे सत्र संस्थेचे ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य व छात्रावास संचालन समितीचे प्रमुख श्री.प्रविण जोशी यांनी घेतले.त्यांनी रोजगार कसा मिळवता येइल यासाठी आपली पात्रता कशी असावी व त्यानुसार आपण व्यवसाय कसा करू शकतो हे उदाहरणासह समजावून सांगितले.आपण आपल्याच स्थानी छोटे भांडवल उभे करून आपला व्यवसाय उभा करू शकतो व त्याला बाजारात विकू शकतो परंतू आपल्यात त्याकरीता कौशल्य निर्माण करावे लागेल हे त्यांनी पटवून सांगीतले.छोटे छोटे उपक्रम आपण राबवू शकतो,उदाहरणार्थ निर्माल्य व तत्सम आवश्यक कच्चा माल आपण आपल्या स्थानी जमा केल्यास चांगल्या उदबत्त्या तयार करून त्या विकू शकतो तसेच रध्धी जमा करून किंवा चांगला खाकी कागद आणून त्याचे विविध आकाराचे पाकीट तयार ते दुकानदारास आपण विकू शकतो.बचत गटातील महिला जुन्या साड्यांच्या पिशव्या शिवू शकतात,त्या आपण विकू शकतो.जे पारधी बंधू आले होते,त्यातील अनेक जण पदवीधर होते,दोघानी हाँटेल मँनेजमेंटचा कोर्स केला आहे,ते चांगल्या हाँटेलमधे नोकरी करू शकतात.एक जणाने आय टी आय करून संगणक डिप्लोमा केला आहे,एकाने आय टी आय मधून वेल्डींग चा डिप्लोमा केला आहे,तो वेल्डिंगचे काम करू शकतो,तो ट्रँक्टर सुद्धा दुरूस्त करतो,एक जण डिलीव्हरी बाँयचे काम करू शकतो,कुणी कमी शिकले होते,त्यानी मजूरीचे काम करायची तयारी दर्शविली.दोन जणांजवळ वाहनचालकांचा परवाना आहे.ते वाहनचालकाचे काम करू शकतात.कोणकोण काय काय करू शकतो या बाबत प्रत्येकाशी या कार्यशाळेत संवाद साधण्यात आला.आता आम्ही या या सर्वांना त्यांच्या रोजीरोटी साठी कशी मदत करता येइल याचा क्रुति कार्यक्रम आखून पुढील दोन महिन्यात ही मदत देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

या सत्रास जोडून संस्थेचे उपाध्यक्ष श्री.रविंद्र कर्वे यांनीही मार्गदर्शन केले.त्यांनी अंबादेवी संस्थानच्या रूग्णसेवा या उपक्रमांतर्गत पारधी रूणांना विनामुल्य कशी आरोग्यसेवा देता येइल या बाबतची माहिती दिली व या कोणकोणती कागदपत्रे आणली पाहीजे हेही सांगितले. या करीता गरजूंनी ५००००/च्या आत उत्पन्न असणारे

तहसिलदार यांचे प्रमाणपत्र,रहिवाशी दाखला व आधारकार्ड आणावे ही माहिती दिली.कार्यशाळेत या आवश्यक विषयावर सविस्तर चर्चा झाली.

कार्यशाळेचा समारोप संस्थेचे अध्यक्ष अविनाश देशपांडे यांनी केला.त्यानी संस्थेचा उद्देश केवळ पारधी समाजाचे उत्थान हाच आहे.पारधी समाज संपन्न झाला पाहीजे.त्या करीता जे जे करता येइल ते करण्याचा संस्था कसोशीने प्रयत्न करीत आहे.बचत गट,शेतीकरिता मदत,रोजगार मिळावा या करीता मदत,आरोग्य रक्षक योजना,बेड्यांवर संस्कार केंद्रे,मुलांच्या शिक्षणासाठी विवेकानंद छात्रावासाचे निर्माण,छात्रावासातून विद्यार्थी शिकुन प्रगत होत आहेत.हे सर्व प्रयत्न संस्थेचे कार्यकर्ते तनमनधनाने करीत आहे.हे सगळ काही पारधी समाजाच्या उत्थानासाठी होत आहे याची जाण आपण ठेवावी.तुम्ही व आम्ही एक आहोत.आपले एकच कुटूंब आहे.पारधी समाजाचे सर्वतोपरी उत्थान हा संस्थेचा एकमेव उद्देश आहे आणि म्हणून आपण शिकून प्रगत होणे,चांगला रोजगार करून आपले कुटूंब सांभाळून व आपली वस्ती,आपला बेडा आदर्श कसा राहील या कडे सर्वानी लक्ष देणे गरजेचे आहे.व्यसनापासून दुर राहणे,आपले आरोग् चांगले ठेवणे,आपले घर व आपली वस्ती,बेडा स्वच्छ ठेवणे व आपल्या वस्तीत कुठेही कलह होणार नाही असे आनंदी वातावरण निर्माण करणे,थोडक्यात आपला बेडा हा तंटामुक्त मुक्त राहावा यासाठी आपण सदोदीत प्रयत्न केले पाहीजे.आपल्या समाजाचे नेत्रुत्व आपणच केले पाहीजे.कुण्याही दलालाच्या मागे जावू नका.आपणच आपले काम शिकून,वाचून करा म्हणजे आपली फसवणूक होणार नाही.आपण हे सर्व करावे.आम्ही तुमच्या कायम सोबत व आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.तुम्ही आम्हाला साथ द्यावी.मला हा विश्वास आपण या मार्गाने गेलो तर आपल्या जिल्हाचे पारधी समाजाचे चित्र आपण चांगले उभे करू.तेव्हा उठा,जागे व्हा व कर्तव्य सिद्धीस तत्पर व्हा.

कार्यशाळेचे संचलन संस्थेचा पूर्णकालिक कार्यकर्ता प्रशांत पवार यांने केले.कार्यशाळेत सुरवातीला जनसेवा ही ईश्वरभक्ती हे गीत अविनाश देशपांडे यांनी सांगितले.आभारप्रदर्शन प्रशांत पवार यानी केले.मिलिंद देशपांडे यांनी गायिलेल्या सुंदर पावन भावना सभीके सुखकी कामना या सेवागीताने झाली.कार्यशाळेस संस्थेचे पदाधिकारी सुनिल वेळूकर,मधुसूदन दुचक्के व छात्रावासाचे पर्यवेक्षक नरेंद्र भोसले उपस्थित होते.

2-1.jpg 3-1.jpg 4-1.jpg

5-1.jpg