प्रज्ञा प्रबोधिनी अमरावती द्वारा आयोजित माधव आरोग्य रक्षक योजने अंतर्गत आरोग्र रक्षक प्रशिक्षण कार्यशाळेस पारधी बंधू भगिनी आरोग्य रक्षकांचा भरघोस असा प्रतिसादः
नुकतीच रविवार दि.२९-८-२०२१ रोजी विवेकानंद छात्रावासात आरोग्य रक्षकाचे प्रशिक्षण सत्र दुपारी ३-३०ते ५-३-३० या वेळात आयोजीत करण्यात आले होते.प्रशिक्षक व प्रमुख अतिथी म्हणून डाँ.हेडगेवार रूग्णालय अमरावती येथील वैद्यकीय अधिकारी डाँ.प्रज्ञा बनसोड व डाँ. वसुंधरा घोडेस्वार उपस्थित होत्या.कार्यक्रमात सुरवातीला दीपप्रज्वलन व भारतमाता प्रतिमेचे पुजन करण्यात आले.प्रशांत पवार याने जनसेवा ही ईश्वरभक्ति हे गीत सांगितले.प्रशिक्षण सत्राचे प्रास्ताविक व प्रशिक्षण सत्र घेण्याबाबतची भुमिका संस्थेचे अध्यक्ष अविनाश देशपांडे यांनी विषद केली.यानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षण सत्रास प्रारंभ झाला.उपस्थित १९वस्त्यातील आरोग्य रक्षकांना किट देण्यात आल्या.डाँ.प्रज्ञा बनसोड व डाँ.वसुंधरा घोडेस्वार यांनी आरोग्य रक्षकांना आरोग्य किट कशी हाताळावी.कुठल्या आजारावर कुठले औषधे,गोळ्या,सायरप कसे व किती मात्रात द्यावे याबद्दल सविस्तर माहिती दिली.प्रत्येक औषध औषध घेतांना कोणती दक्षता व काळजी घ्यावी ही माहिती दिली.वैद्यकिय किटमधे प्राथमिक स्वरूपात सर्व प्रकारची औषधे देण्यात आली होती.या किटमधे औषध कसे व किती मात्रात याचे टिपणही देण्यात आले.प्रशिक्षण सत्रास दिवानखेड,मार्डी,शेंदोळा,शेंदूरजनाबाजार,वाघोली,केकतपूर,असदपूर, साखळी,सिंधी,चांदूररेल्वे, बासलापूर,तरोडा,दारापूर,चंडीकापूर, हिंगलाजपूर,धानोराफशी,वडुरा,नांदगावखंडेश्वर व शिरपूर येथील वस्त्यांमधून पारधी बंधू भगिनी आरोग्य रक्षक म्हणून सहभागी झालेत.
प्रशिक्षण सत्राचे संचलन संस्थेचे सहसचिव प्रविण डाके यांनी केले.कार्यशाळेस आरोग्य रक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला.प्रशिक्षण सत्र अतिषय आनंददायी व प्रसन्न वातावरणात संपन्न झाले आम्हाला औषधे अमरावती येथील सामाजिक कार्यकर्ते मा.अभयजी देव व त्यांची चमु,तसेच काही डाँक्टर्स मंडळीनी उपलब्ध करून दिलीत.आम्ही अभय देव व त्यांची चमु,डाँक्टर्स मंडळी,प्रशिक्षक डाँ.प्रज्ञा बनसोड,डाँ.वसुंधरा घोडेस्वार यांच्या भरघोस सहकार्या बद्दल आभारी आहोत.या प्रशिक्षण सत्रासाठी संस्थेच्या चमुतील प्रविण जोशी,प्रविण डाके,जयंत खंदारकर,सुनिल वेळूकर,मिलिंद देशपांडे, मुकूंद देशपांडे, नरेंद्र भोसले,प्रशांत पवार,पवन पवार,सुरज भोसले,अर्जुन भोसले,पिंकी भोसले,रितेश पवार यांनी खुप मेहनत घेतली म्हणूनच हे प्रशिक्षण सत्र चांगले संपन्न झाले त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन.प्रशिक्षण सत्राचा समारोप संस्थेचे अध्यक्ष अविनाश देशपांडे यांनी केला.सर्वांनी ही औषधे घ्यावीत व आरोग्य रक्षकांनी वस्तीतील सर्वांना आवश्यकतेनुसार योग्य ती काळजी घेवून द्यावीत व त्याचे योग्य ते टिपणही ठेवावी असे ते म्हणाले.आकस्मिक प्रसंगी उपचारासाठी अमरावतीला योग्य त्या संपर्कसुत्रावर फोन करून यावे.संस्था आपल्याला योग्य ती मदत करेल हेही आश्वस्त केले.आता संस्थेच्या सर्व उपक्रमात वस्तीतील पारधी चमु सहभागी होत आहे हे आमचे यश आहे.ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.आम्हास या सेवाकार्यात सर्वानी मदत करावी असे आवाहन मी आपणास करतो.




