प्रज्ञा प्रबोधिनी अमरावती संस्थेतर्फे हिंगलाजपुर पारधी बेड्यात जल योजनेचे लोकार्पणः
प्रज्ञा प्रबोधिनी अमरावती जिल्ह्यात पारधी समाजाकरीता सेवाकार्य करीत आहे.हिंगलाजपुर या वस्तीत या गावात पाणी वितरण व्यवस्था असून सुद्धा या वस्तीत पाण्यापासून वंचित होते.वस्तीत पाणी मिळत नव्हते.जे मिळत होते ते थोडे बहुत होते ल तेही अशुद्ध होते.त्यामुळे आजार होत होते.आमच्या संस्थेने त्यांची ही समस्या दूर केली व त्या ठिकाणी त्यांना बोअरवेल व वितरण व्यवस्था उपलब्ध करून दिली.आता सर्वांना शुद्ध व मुबलक पाणी मिळत आहे.
या जल योजनेचा लोकार्पण सोहळा दि.२-९-२०२१ला सायंकाळी या वस्तीत विधिवत पुजन करून संपन्न झाला.लोकार्पण सोहळा संस्थेचे सहसचिव प्रविण डाके,व अन्य पदाधिकारी मिलिंद देशपांडे, सुनिलजी वेळूकर व जयंतजी खंदारकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.कार्यक्रमास वस्तीतील नागरिक बंधू भगिनी व बाल गोपाल मंडळी उपस्थित होती.यावेळी सर्वांना मिलिंद देशपांडे यांनी सांगितले की ही योजना आम्ही तुम्हाला शुद्ध व मुबलक पाणी मिळावे या उद्देशाने दिली आहे.तिचा व्यवस्थित उपयोग करावा.पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा.जल है तो कल है।येणाऱ्या काळात पर्जन्यमान कमी झाल्यास पाण्याची समस्या वेळोवेळी निर्माण होवू शकतो तेव्हा पाण्याचे महत्व जाणून घ्या आमची संस्था या वस्तीत स्व.नानाजी देशमुख क्रुषि सहाय्यता योजनेअंतर्गत पारधी शेतकय्रांना वेळोवेळी आवश्यक ती मदत करते,माधव आरोग्य रक्षक योजने अंतर्गत सर्वांना मोफत औषधांचे वितरण करण्यात येते,प्रसंगी अमरावती येथे रूग्णावर उपचार करण्यास मदत करण्यात येतात,या ठिकाणी संस्थेचा बचत गट सुद्धा आहे तसेच लहान मुलांकरीता संस्कार केंद्रही चालविल्या जाते.
मित्रहो पाण्याची समस्या इतरही पारधी वस्त्यात आहे त्या ठिकाणांवर सुद्धा जल योजना देण्याचा आमचा मानस व प्रयत्न आहे.आता फक्त आपल्या सहकार्याची आम्हास अपेक्षा आहे.सेवा है यज्ञकुंड समिधासम हम जले।