प्रज्ञा प्रबोधिनी अमरावती - संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानः
प्रज्ञा प्रबोधिनी अमरावती हा परिवार प्रज्ञा प्रबोधिनी अमरावती या न्यासामार्फत पारधी समाजाकरीता गेल्या १८ वर्षापासून सेवाकार्य करीत आहे.विविध उपक्रम आमचा हा सेवाप्रकल्प विविध पारधी समाजाकरीता राबवित आहे.वस्त्यांमधे बचत गट,क्रुषि सहाय्यता योजना,संस्कार केंद्र,आरोग्य रक्षक योजना,विविध विषयावर कार्यशाळेचे आयोजन,वस्त्यांमधे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते याशिवाय अमरावती येथे दस्तुरनगर भागात संस्थेने पारधी पाल्यांकरीता शैक्षणिक विवेकानंद छात्रावास स्वतःच्या वास्तूत सुरू केले आहे.जवळपास ३०विद्यार्थी या छात्रावासात आहे.काही जणांनी १०वी,१२वी,दोन जण वाणिज्य प्रथम वर्षामधे शिकत आहे.एक जण आयटीआय दोन वर्षाचा अभ्यासक्रम या वर्षी पूर्ण करेल.ही आमची छात्रावासाची यशस्वी गाथा आहे.एक विद्यार्थी आमचा एम एस डब्लू अंतिम वर्षास आहे हे विशेष.
या पू.महात्मा गांधी जयंतीच्या पावन पर्वावर संस्थेने २आँक्टोबर ते १५आँक्टोबर या कालावधीत आरोग्य व स्वच्छता अभियान सहा वस्त्यांमधे राबविण्याचा संकल्प केला आहे.या कालावधीत वस्तीची व स्वतःच्या घराची स्वच्छता,व या वस्त्यांमधे आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजनही संस्थेने केले आहे.या अभियानाची सुरवात यशस्वीरीत्या आमच्या वडुरा वस्तीत व हिंगलाजपूर देवी या वस्तीत २आँक्टोबर या पावन दिनी झाली.
संस्थेच्या पारधी समाज सेवाकार्यास आता चांगले यश प्राप्त होत आहे.आमच्या सततच्या कष्टप्रद प्रवासास यश येत आहे.पारधी समाजात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यात आम्हाला यश मिळत आहे ही अभिमानाची बाब आहे.या सेवाकार्यात आम्हाला मोठा टप्पा गाठायचा आहे त्याकरीता कार्यकर्ता चमु अविरतपणे काम करत आहे.आता तुम्हा सर्वाची खूप मोठी साथ आम्हाला हवी आहे.सहकार्याची आपणाकडून आम्ही अपेक्षा करतो.
देश हमे देता है सबकुछ।
हमभी तो कुछ देना सिखे।
आओ इस यज्ञ मे आपभी सम्मिलित हो।
सेवा है यज्ञकुंड।हमभी तो कुछ देना सिखे।
पू.महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांना २आँक्टोबर जयंतीचे दिवशी विनम्र अभिवादन.
प्रज्ञा प्रबोधिनीस सेवाकार्याकरीता तनमनधन पूर्वक सहकार्य करा या करीता आम्ही आवाहन करीत आहोत.
स्नेहांकीत
प्रज्ञा प्रबोधिनी
अमरावती.




