प्रज्ञा प्रबोधिनी अमरावती व जनकल्याण सेवा संस्था अमरावती अंतर्गत डॉ. हेडगेवार रूग्णालय व अनुसंधान केंद्र अमरावती यांच्या संत.गाडगेबाबा प्रकल्प व प्रज्ञा प्रबोधिनीच्या माधव आरोग्य रक्षक योजने अंतर्गत दि.५-१०-२०२१रोजी वडुरा,धानोरी फशी व हिंगलाजपूर व दि.६-१०-२०२१रोजी दिवानखेड,मार्डी व शेंदोळा येथे पारधी रूग्णाची वैद्यकिय तपासणी डॉ. हेडगेवार रूग्णालयाच्या डाँ. अंजली गुप्ता व सहयोगी परिचारिका यांनी केली.दोन्ही ठिकाणी एकूण १९२रूग्णांची तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली.या वैद्यकीय तपासणीस पारधी रूग्णांनी उस्फूर्त असा प्रतिसाद दिला.डाँ. अंजली गुप्ता व सहयोगी परिचारिका यांनी मनोभावे सेवा दिली त्याबद्दल डाँ. हेडगेवार हाँस्पिटलची चमु व जनकल्याण सेवा संस्थेचे या बहुमूल्य सेवेबद्दल आम्ही आभारी आहोत.आता संस्थेचा सर्व वस्त्यांमधे ही वैद्यकीय तपासणी करण्याचा मानस आहे.मित्रहो पारधी वस्त्या या त्या त्या गावापासून दूर आहेत व तेथे प्राथमिक व कोणत्याच आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत व आर्थिक परिस्थिती अतिषय हलाकीची असल्याने आवश्यकता असूनही उपचार करू शकत नव्हती म्हणून माधव आरोग्य रक्षक योजनेची व्याप्ती वाढवून सर्व ठिकाणी आरोग्य सुविधा पुरविण्याचा संस्थेचा आगामी काळात प्रयत्न आहे.या उपक्रमात आम्हास जनकल्याण सेवा संस्था अमरावती आम्हास मदत करीत आहे.
वैद्यकीय तपासणीच्या वेळी या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष अविनाश देशपांडे, सचिव मुकूंद पांडे,व अन्य पदाधिकारी मिलिंद देशपांडे,जयंत खंदारकर, सुनिल वेळूकर व प्रकल्प कार्यकर्ते नरेंद्र भोसले,प्रशांत पवार,सचिन भोसले,प्रकाश पवार,पुजा काळे,विनोद काळे,राजेश सोळंके,अर्चना सोळंके व चंद्रपाल भोसले यांनी विविध पारधी वस्त्यात ही वैद्यकीय तपासणी करण्यासाठी खूप प्रयत्न केलेत.डाँ. हेडगेवार हाँस्पिटल चे ब्राम्सणवाडे व वाहनचालक यांनीही आम्हाला खूप सहकार्य केले त्याबद्दल आम्ही त्यांचेही आभारी आहोत.कोणीही पारधी योग्य उपचारा पासून वंचित राहू नये ही भावना घेवून वरील दोन्ही संस्था निरपेक्षपणे हे सेवाकार्य करीत आहेत.