आज प्रज्ञा प्रबोधिनी अमरावती तर्फे महात्मा गांधी जयंती निमित्ताने दिवानखेड,चांदूररेल्वे,येथे संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान राबविण्यात आले.यात वस्तीची स्वच्छता करण्यात आली.या अभियानात संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर भारतीय,प्रविण जोशी,कोषाध्यक्ष मुकूंद देशपांडे, मधुसूदन दुचक्के,नरेंद्र भोसले,पिंकी भोसले,व दिवानखेड येथील पारधी बंधूभगिनीनी सहभाग घेतला तर चांदूररेल्वे येथे हे अभियान धर्मेंद्र पवार व त्यांच्या मातोश्री यांच्या नेत्रुत्वात राबविण्यात आले.या ठिकाणी संस्थेचे सचिव मुकूंदराव हे उपस्थित होते.एकंदरीत अभियान चांगले झाले.